मोदी @९ अभियान अंतर्गत निलेश राणे यांनी घेतल्या आचरा भागातील शक्तिकेंद्र प्रमुखांच्या भेटी

⚡मालवण ता.०५-: भाजपा नेते निलेश राणे यांनी बुधवारी मोदी @९ अभियान अंतर्गत मालवण तालुक्यातील आचरा भागातील शक्तिकेंद्र प्रमुखांच्या भेटी घेतल्या.

आचरा येथे अरविंद सावंत यांच्या निवासस्थानी झालेल्या भेटीत
संघटनात्मक चर्चा तसेच मतदारसंघात सुरू असलेल्या घरो घरी संपर्क अभियानाचा आढावा घेण्यात आला. या दौऱ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या समर्थनार्थ मोबा ९०९०९०२०२४ या नंबरवर मिस्ड कॉल देत समर्थन देण्याचे आवाहन निलेश राणे यांनी करून ९ वर्षातील केलेल्या कामांची माहिती त्यांनी यावेळी दिली.

यावेळी रामेश्वर विकास सोसायटीची जिल्हा बँकेकडून देण्यात येणारी वीस हजार कर्ज मर्यादा वाढवून पन्नास हजार करण्याची मागणी डॉ कोळंबकर यांनी केली.याबाबत निलेश राणे यांनी तातडीने जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी यांच्याशी फोनवरून संपर्क साधत खासबाब म्हणून यात लक्ष देण्यास सांगितले.

यावेळी अशोक सावंत, धोंडू चिंदरकर, बाबा परब, राजन गांवकर, जेरान फर्नांडिस, संतोष कोदे, अरविंद सावंत, जयप्रकाश परुळेकर, मोदी @९ अभियान अंतर्गत निलेश राणे यांनी घेतल्या आचरा भागातील शक्तिकेंद्र प्रमुखांच्या भेटी

You cannot copy content of this page