सेवांगण तर्फे शिष्यवृत्ती मार्गदर्शन वर्गाचे आयोजन

मालवण ता.०५-: मालवण येथील बॅ. नाथ पै सेवांगणच्या वतीने विनामूल्य शिष्यवृत्ती मार्गदर्शन वर्गासाठी दि.८ जुलै रोजी दुपारी ३.३० ते ४.३० यावेळेत सेवांगण येथे प्रवेश चाचणी परीक्षा घेण्यात येणार आहे.

सेवांगण तर्फे यावर्षीही शिष्यवृत्ती मार्गदर्शन वर्गाचे आयोजन करण्यात आले आहे. यात गुणानुक्रमे इयत्ता पाचवीच्या ४० विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात येणार आहे. पाचवीच्या विद्यार्थ्यांसाठी भाषा, इंग्रजी, गणित, बुद्धिमत्ता या विषयांची १०० गुणांची परीक्षा असेल. परीक्षेस बसणाऱ्या विद्यार्थ्यांनी आपली नावे ७ जुलैपर्यंत सकाळी ९ ते सायंकाळी ५ यावेळेत प्रवेशशुल्क १५ रुपये सहित सेवांगण येथे नोंदवावीत. अधिक माहितीसाठी ९४२१५६९७०४, ८७७९५०२७९५ येथे संपर्क साधावा, असे आवाहन सेवांगणच्या वतीने करण्यात आले आहे.

You cannot copy content of this page