मालवण तालुका पत्रकार संघ अध्यक्ष प्रफुल्ल देसाई
*💫मालवण दि.२७-:* आज सर्वत्र होत असलेले इंग्रजी भाषेचे आक्रमण पाहता मराठी भाषेचे संवर्धन होणे गरजेचे आहे. यासाठी आपण सर्वांनी मराठी भाषेचा वापर केला पाहिजे तरच मराठी भाषा टिकेल असे प्रतिपादन दै रत्नागिरी टाइम्सचे पत्रकार आणि मालवण तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष श्री. प्रफुल्ल देसाई यांनी केले. मालवण एस.टी. आगारात साहित्यिक वि. वा. शिरवाडकर (कुसुमाग्रज) यांची जयंती व मराठी राजभाषा दिन साजरा करण्यात आला. यावेळी मालवण तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष प्रफुल्ल देसाई यांच्या हस्ते कुसुमाग्रज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी उपस्थित मान्यवरांनी कुसुमाग्रज यांच्या स्मृतीस अभिवादन केले. यावेळी एसटी आगारातर्फे उपस्थित प्रवाशांना पेढे वाटण्यात आले. यावेळी आगार व्यवस्थापक नरेंद्र बोधे, मराठी पत्रकार परिषद कोकण विभागिय सचिव नंदकिशोर महाजन, श्री. वेंगुर्लेकर, उदय खरात, राजेंद्र कांबळे, विनोद शंकरदास , प्रसाद बांदेकर, श्री. दिलिप हिंदळेकर, शशिकांत मालंडकर, पत्रकार ओंकार यादव आदी उपस्थित होते.
