उत्तम स्टील मार्गे जाणाऱ्या रस्त्याची जिल्हाधिकाऱ्यांसह स्वतः पाहणी करणार

पालकमंत्री उदय सामंत;त्यानंतर पुढील निर्णय देणार असल्याचे दिले आश्वासन

*💫सावंतवाडी दि.२७-:* सावंतवाडी तालुक्यातील उत्तम स्टील मार्गे जाणाऱ्या रस्त्या संदर्भात आज पालकमंत्री उदय सामंत यांच्या सोबत या विषयावर चर्चा करण्यात आली आहे. यावेळी पुढील दौऱ्यावेळी जिल्हाधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या सोबत पाहणी करून पुढील निर्णय घेऊ असे आश्वासन दिले आहे.

यावेळी तालुकाप्रमुख रूपेश राऊळ, जिल्हा परिषद सदस्य मायकल डिसोजा, संघर्ष समितीचे अध्यक्ष जगन्नाथ पंडित, उल्हास परब, गुरुदास गवंडे, भिकाजी धुरी, आबा धुरी, शिवदत्त घोगळे, सुभाष करमकर आदी उपस्थित होते

You cannot copy content of this page