आताची बाळासाहेबांची शिवसेना नव्हे; ही तर ‘औरंगी सेना’

प्रमोद जठार यांनी ठाकरे सरकारला फटकारले

कणकवली : ठाकरे सरकार सत्तेत आल्यावर जनतेला वाटले होते की बाळासाहेब ठाकरेंना अपेक्षीत असलेले हिंदुत्व वादी , महिलांचा सन्मान करणारें , रयतेचे सरकार आले. परंतु झाले विपरीत. ठाकरे सरकार चे गब्रु सरकार झाले .कुंपणच शेत खाऊ लागले. लोकांना वाटले राज्याच्या पाटलाचे हात कलम करणाऱ्या महाराज्यांचे नाव लावणारी ही सेना आहे. पण निघाली मुघलांपेक्षा वरतान औरंगी सेना अशा अत्यंत जहाल शब्दांत भाजपा प्रदेश चिटणीस प्रमोद जठार यांनी ठाकरे सरकारला फटकारले आहे. रयतेच्या काडीलाही हातलावु नका असे सांगणाऱ्या महाराजांची शिकवण हवेत विरुन गेली. गब्रु सरकारातील मंत्री दिवसा ढवळ्या रयतेच्या पोरी बाळी नासवु लागले. मुख्यमंत्री महोदयांचा जनतेला न्याय देण्याच्या वचनानाम्यातील शिवशाहीतील वाघोबाचा पेशवाईतील राघोबा झाला हेच खरे ! रामशात्स्री बाणा दाखवुन इतिहास घडविण्याची संधी गब्रु सरकार ने गमावली अशा बोचऱ्या शब्दांत भाजपा प्रदेश चिटणीस प्रमोद जठार यांनी ठाकरे सरकारचे वाभाडे काढले आहेत.

You cannot copy content of this page