मालवण शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या नुकत्याच झालेल्या बैठकीत केले स्वागत
*💫मालवण दि.२७-:* मुबई येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या उपस्थितीत पक्षात प्रवेशकर्ते झालेल्या जयंत पाटकर आणि श्रीमती सदफ खटखटे या दोघांचा मालवण शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या नुकत्याच झालेल्या बैठकीत स्वागत करीत सत्कार करण्यात आला मालवण शहर राष्ट्रवादी काँग्रेसची बैठक कुंभारमाठ येथे झाली.यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे मालवण तालुका – अध्यक्ष डॉ. विश्वास साठे यांनी प्रास्ताविक केले. अल्पसंख्याक सेलचे अध्यक्ष सलीम खान, शहर अध्यक्ष ऑगोस्तीन डिसोझा आणि प्रमोद कांडरकर यांनी मार्गदर्शन केले. यावेळी पंचायत समिती सदस्य विनोद आळवे, बाबू डायस, सारिका डायस, मॅक्सी फर्नाडिस आदी उपस्थित होते.
