गोठ्यावर आंब्याचे झाड पडून अडीज ते तीन लाखाचे नुकसान

⚡कणकवली ता.२४-: कणकवली तालुक्यातील डामरे गावठणवाडी येथे पावसामुळे संतोष बापू साटम यांच्या गोठ्यावर आंब्याचे झाड पडून अडीज ते तीन लाखाचे नुकसान झाले.गोठ्यातील 18 गुरांपैकी 2 गुरांना जखम झाली आहे.

कणकवली तहसीलदार यांना सदरच्या घटनेची माहिती गावचे माजी सरपंच बबलु सावंत यांनी दिल्यावर तात्काळ मंडळ अधिकारी योजना सापळे यांनी महसूल कोतवाल दीपक कदम यांना पाठवून घटनेची माहिती घेतली
यावेळी गावचे उपसरपंच सागर साटम ,पोलीस पाटील विश्वास सावंत ,ग्रामस्थ एकनाथ गावकर, प्रदीप जाधव, संतोष पाटिल, सगर साटम, संतोष गावकर, आयुष सावंत, प्रकाश सावंत,सदानंद साटम, गोट्या जाधव, हेरंब राणे, योगेश सावंत, ओंकार राणे, प्रशांत सावांत भास्कर सावंत यांच्या मदतीने झाड हटविले गेले.

You cannot copy content of this page