पोडलोसमध्ये कर्तबगार महिलांचा सन्मान

⚡बांदा ता.२४-: पाडलोस ग्रामपंचायतीतर्फे ग्रामस्तरावर दिला जाणारा पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर पुरस्कार पाडलोस पोलीस पाटील रश्मी माधव यांच्यासह संगीता आंबेकर, दीप्ती गावडे, दीप्ती करमळकर, विजया गावडे, ललिता पाडलोसकर यांना प्रदान करण्यात आला. सामाजिक कार्य केल्याबद्दल सत्कार केला.

यावेळी सरपंच सलोनी पेडणेकर, उपसरपंच राजू शेटकर, ग्रामसेवक प्रतिभा आळवे, पाडलोस सोसायटी व्हाईस चेअरमन विश्वनाथ नाईक, कृषी सहाय्यक श्वेता बेळगुंदकर व ग्रामपंचायत कर्मचारी उपस्थित होते.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे,उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महिला व बालकल्याण मंत्री मंगलप्रभात लोढा,यांच्या स्वाक्षरीने हा पुरस्कार सामाजिक क्षेत्रात केलेल्या
उल्लेखनीय योगदानाबद्दल महिला व बाल विकास विभाग महाराष्ट्र शासन ,ग्रामपंचायत स्तरिय पुरस्कार देवून गौरविण्यात आले.

You cannot copy content of this page