Headlines

आरोग्य अधिसूचना विरोधी संघर्ष समिती ५ जुलैला आझाद मैदानावर करणार उपोषण

हिवताप कर्मचाऱ्यांच्या पदोन्नती रखडल्याने करणार आंदोलन

मालवण दि प्रतिनिधी
मालवण राज्यातील हिवताप विभागाकडील ७ हजार ४५० कर्मचारी दोन वर्ष पदोन्नतीपासून वंचित आहेत. सुधारीत सेवा प्रवेश नियमांद्वारे पदांची शैक्षणिक अर्हता बदलल्याने हा फटका बसला आहे. जुन्या नियमांनुसार पदोन्नती द्यावी व अन्य मागण्यांसाठी आरोग्य अधिसूचना विरोधी संघर्ष समितीतर्फे ५ जुलैपासून आझाद मैदानावर उपोषण सुरू केले जाणार आहे.

सार्वजनिक आरोग्य विभागाने २९ सप्टेंबर २०२१ रोजी अधिसूचना काढली. त्यामध्ये हिवताप विभागाकडील सेवाप्रवेश नियम सुधारीत केले. क्षेत्रीय कर्मचारी, बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारी, आरोग्य सेवक, आरोग्य निरीक्षक, आरोग्य पर्यवेक्षक, प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी, अवैद्यकिय आरोग्यधिकारी या पदांसाठी शैक्षणिक अर्हता सुधारीत केली आहे. त्याचा फटका कर्मचाऱ्यांना बसला. पदोन्नतीपासून वंचित राहिले आहेत. कर्मचाऱ्यांची बदली प्रक्रिया समुपदेशनाद्वारेच करावी या व अन्य मागण्यासाठी ३० जूनची डेडलाईन दिली आहे. मागण्या मान्य न झाल्यास ५ जुलैपासून मुंबईत आझाद मैदानावर उपोषण सुरू करण्याचा इशारा संघर्ष समितीने ददिला आहे.

You cannot copy content of this page