कार्यवाह प्रसाद कुबल:परीक्षा प्रमुखपदी धोंडी गावडे
⚡मालवण ता.१९-: सिंधुदुर्ग जिल्हा गणित अध्यापक मंडळाच्या अध्यक्षपदी श्री शिवाजी विद्यामंदिर काळसेचे मुख्याध्यापक श्री. तुकाराम सदाशिव पेडणेकर यांची तर जिल्हा कार्यवाह श्री देवी शांतादुर्गा हायस्कूल वडाचापाटचे मुख्याध्यापक श्री. प्रसाद हनुमान कुबल व जिल्हा परीक्षा प्रमुख बॅ. नाथ पै विद्यालय, कुडाळचे श्री. धोंडी रविंद्र गावडे यांची एकमताने निवड करण्यात आली आहे .
सिंधुदुर्ग जिल्हा गणित अध्यापक मंडळ महाराष्ट्र गणित अध्यापक महामंडळाशी संलग्न आहे. या मंडळाच्या जिल्हा कार्यकारिणी निवडीची सभा मावळते जिल्हाध्यक्ष भंडारी एज्यु. सोसायटी हायस्कूल, मालवणचे माजी मुख्याध्यापक श्री. वामन गेंदाप्पा खोत यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. निवड प्रक्रियेत निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून औदुंबर शिवदास भागवत यानी काम पाहिले.
या कार्यकारिणीत महामंडळ प्रतिनिधी – भाऊसाहेब शंकर चवरे (श्री. भाईसाहेब सावंत माध्य. विद्यालय माजगांव) व संदिप बळवंत शिंदे (अर्जुन रावराणे विद्यालय, वैभववाडी), जिल्हा उपाध्यक्ष- राजाराम धोंडिबा फर्जंद (माध्य. विद्यालय सोनावल), महेश कृष्णा चव्हाण (विद्यामंदिर परुळे) व रामचंद्र नामदेव भानुसे (माध्य. विद्यामंदिर कनेडी), जिल्हा सहकार्यवाह- नागेश गिरजाप्पा विरकर (श्री भगवती हायस्कूल मुणगे), श्री. विजयकुमार पांडुरंग राठोड (न्यू इंग्लिश स्कूल फोंडाघाट) व श्री. नंदू पिळणकर (साळगाव हायस्कूल) यांची निवड झाली. तर मालवण तालुकाध्यक्ष- मिलिंद चंद्रकांत शिरोडकर (अ.शि. दे. टोपीवाला हायस्कुल, मालवण) व कार्यवाह- दत्तप्रसाद प्रदिप परुळेकर (भ.ता. चव्हाण म.मा. विद्यालय चौके), कुडाळ तालुकाध्यक्ष – सुशिलकुमार पांडुरंग कडुलकर (कुडाळ हायस्कूल, कुडाळ) व कार्यवाह- विलास सिताराम राठोड (लिंगेश्वर विद्यालय तुळसुली), सावंतवाडी तालुकाध्यक्ष- दशरथ रामकृष्ण श्रृंगारे (राणी पार्वतीदेवी हायस्कूल, सावंतवाडी), कार्यवाह- रोहन गोविंद पाटील (कै. बाबुराव पाटयेकर माध्य. विद्यालय, दानोली) कणकवली तालुकाध्यक्ष- संदिप संतू सावंत (शंकर महादेव विद्यालय कुंभवडे), कार्यवाह- भाग्येश कदम (न्यू इंग्लीश स्कूल फोंडा), वेंगुर्ला तालुकाध्यक्ष – हरगुडे चाळोबा मनोहर (श्री सरस्वती विद्यालय आरवली- टांक), कार्यवाह- सौ. सविता शंकर जाधव (रा. कृ. पाटकर हायस्कूल वेंगुर्ला), वैभववाडी तालुकाध्यक्ष – धनाजी शंकर भोसले (शोभना नारायण विद्यालय, नानिवडे), कार्यवाह- श्री. स्वप्नील श्रीकांत पाटील (माधवराव पवार हायस्कूल कोकीसरे), देवगड तालुकाध्यक्ष -शिवाजी रामचंद्र ढाकणे (अनंत केळकर हायस्कूल, वाडा), कार्यवाह- रमेश न्हानू कविटकर (श्रीधर लेले हायस्कूल, मुटाट) दोडामार्ग तालुकाध्यक्ष – संतोष शामराव मेथे (किर्ती विद्यालय घोटगेवाडी), कार्यवाह- अरुण श्रीकांत सावंत (माध्य. विद्यालय माटणे) यांची निवड झाली. तसेच सिंधुदुर्ग जिल्हा गणित अध्यापक मंडळ सल्लागार म्हणून औदुंबर शिवदास भागवत, वामन गेंदाप्पा खोत व सुनिल आपय्या कुंभार यांची निवड करण्यात आली आहे
