बांदा/प्रतिनिधी
भारतीय तंत्रज्ञान संस्थेतील (आयआयटी) प्रवेशासाठी घेण्यात आलेल्या ‘जेईई ऍडव्हान्स’ परीक्षेत बांदा येथील तन्वी प्रशांत बांदेकर या विद्यार्थिनीने सिंधुदुर्ग जिल्ह्यातून प्रथम तर संपूर्ण देशातून १५७३ वी रँक मिळवून उल्लेखनीय यश मिळविले आहे.
या परीक्षेसाठी देशभरातून ४३ हजार ७७३ विद्यार्थी पात्र ठरले आहेत. इंजिनिअरिंग क्षेत्रातील ही भारतातील सर्वात प्रतिष्ठित समजली जाणारी ही सर्वात कठीण परीक्षा आहे. तन्वी हिच्या यशाने तिचे सर्वत्र कौतुक होत आहे. तिला या यशामुळे आयआयटी साठी भारतातील कोणत्याही नामांकित संस्थेत प्रवेश मिळणार आहे.
फोटो :-
तन्वी बांदेकर.
