राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने कुडाळात उद्या जागतिक गद्दार दिन साजरा होणार…

अमित सामंत; ५० खोक्यांचा देखावा उभारणार..

सावंतवाडी ता.१९-: गेल्यावर्षी २० जून रोजी ४० आमदारांनी महाविकास आघाडीच्या पाठित खंजीर खुपसला. उद्धव ठाकरेंचा पाठीत खंजीर खुपसून हे गुवाहाटीला निघून गेले. महाराष्ट्रातील लोकशाहीतला हा काळा दिवस आहे. हा दिवस जागतिक गद्दार दिवस म्हणून साजरा करायच आम्ही ठरवलेल आहे. उद्या सकाळी कुडाळला ५० खोक्यांचा देखावा तयार करून त्याची आरती केली जाणार आहे अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अमित सामंत यांनी आज येथे दिली.

यातील एक व्यक्ती शिक्षणमंत्री दीपक केसरकर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आहे. सावंतवाडीच्या जनतेन त्यांच्यावर विश्वास टाकला होता. त्यांचा घात केसरकरांनी केला. शरद पवार, उद्धव ठाकरे यांच्यासोबत केसरकर यांनी विश्वसघात केला. आज ते नारायण राणेंना जवळ करत आहेत. अशा केसरकरांचा निषेध राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी उद्या गद्दार दिन पाळुन करत आहे असं मत अमित सामंत यांनी व्यक्त केले.

दरम्यान, आगामी विधानसभा निवडणुकीत सावंतवाडी विधानसभा मतदारसंघ राष्ट्रवादीला जागा मिळाल्यास अर्चना घारे-परब या उमेदवार असतील. खासदार विनायक राऊत यांनी महाविकास आघाडी म्हणून घेतलेल्या भुमिकेबद्दल त्यांचे आभार व्यक्त करतो. सावंतवाडी हा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला असल्यानं या ठिकाणी आमचा दावा असणार आहे. कुडाळ व कणकवली विधानसभेत महाविकास आघाडी म्हणून राष्ट्रवादी शिवसेनेचा मागे उभी राहिल अशी माहिती सामंत यांनी दिली.

You cannot copy content of this page