अर्चना घारे परब; झिरंगवाडीतील महिला व युवकांचा राष्ट्रवादीमध्ये प्रवेश
⚡सावंतवाडी ता.१९-: प्रत्येक क्षेत्रात महिला आज आघाडीवर आहेत यापुढेही महिलांनी पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम करावे असे आव्हान राष्ट्रवादी कोकण विभाग महिला अध्यक्ष सौ अर्चना घारे परब यांनी आज येथे केले. सावंतवाडी शहरात दररोज भाजी विक्रेते करणाऱ्या महिलांना छत्र्या वाटप कार्यक्रमात त्या बोलत होत्या.
यावेळी बोलताना घारे परब म्हणाले छत्र्या वाटपाच्या कार्यक्रमातून आपल्याला आनंद मिळाला भविष्यात कधीही हाक मारा आपण तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहू असा विश्वासही त्यांनी यावेळी भाजी विक्रेत्या महिलांना दिल्या. यावे झिरंगवाडी येथील युवक व महिलांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला.

जिल्हाध्यक्ष अमित सामंत, माजी राज्यमंत्री प्रविणभाई भोसले, अल्पसंख्यांक सेलचे जिल्हाध्यक्ष जावेद खतीब, अल्पसंख्यांक जिल्हा कार्याध्यक्ष नजीर शेख, अल्पसंख्यांक सावंतवाडी तालुकाध्यक्ष जावेद शेख, अल्पसंख्यांक उपाध्यक्ष युक्तिकार राजगुरू, सावंतवाडी तालुकाध्यक्ष पुंडलिक दळवी, सावंतवाडी शहराध्यक्ष देवेंद्र टेमकर, महिला शहराध्यक्ष सायली दुभाषी, जिल्हा कार्याध्यक्ष उद्योग व्यापार हिदायतुल्ला खान, महिला निरीक्षक रत्नागिरी जिल्हा दर्शना बाबर देसाई, तालुका चिटणीस काशिनाथ दुभाषी, शहर चिटणीस राकेश नेवगी, युवक तालुकाध्यक्ष हर्षद बेग, तालुका उपाध्यक्ष बावतीस फर्नांडिस, सौ. मारिता फर्नांडिस, जिल्हा सरचिटणीस उद्योग व्यापार नियाज शेख, तालुका उपाध्यक्ष उद्योग व्यापार याकूब शेख, ओबीसी सेल तालुकाध्यक्ष सिद्धेश तेंडुलकर,
