भजनातून मिळालेली बिदागी दिली संवीता आश्रमाला

मालवण पॉलिटेक्निकच्या विद्यार्थ्यांनी जपली सामाजिक बांधिलकी

मालवण दि प्रतिनिधी

मालवण शासकीय तंत्रनिकेतनच्या विध्यार्थ्यांनी भजनातून मिळालेल्या बिदागीच्या रक्कमेतून पणदूर येथील संविता आश्रमाला धान्य दिले. विध्यार्थ्यांनी दानशूरपणा दाखवत केलेल्या या सामाजिक कार्याचे कौतुक होत आहे.

शासकीय तंत्रनिकेतन येथे सरस्वती पूजन दिवशी एक विरंगुळा म्हणून भजन सादर केले होते. यामध्ये वैभव शेटये, सोहम कांबळी, मंदार मुणगेकर, मयूर कदम, वेदांत आचरेकर, यश आचरेकर, गौरेश तांडेल, गौरव चव्हाण, यश चव्हाण, गितेश लाड, सुजय वारंग, यश हडकर, अंकित पेडणेकर, जयेश लुडबे, निशांत जामदार, गितेश साटम, वसंत मेस्त्री या विध्यार्थ्यांचा समावेश होता. काहीकाळातच या भजनास लोकांची पसंती मिळाली आणि गावागावात तसेच जिल्ह्यामध्ये भजनासाठी सुपारी मिळायला लागल्या. हे विध्यार्थी तृतीय वर्ष सिव्हिल व इलेक्ट्रॉनिक्स यामध्ये शिकत होते. परंतु शैक्षणिक वर्ष संपल्यानंतर मिळालेल्या पैशातून हौस मौज करण्यापेक्षा एक सामाजिक बांधिलकी म्हणून संविता आश्रमाला धान्य भेट दिली.

You cannot copy content of this page