आयुष्यमान कार्ड विशेष मोहिमेला मोठा प्रतिसाद

सामाजिक कार्यकर्ते सौरभ ताम्हणकर यांनी केले होते आयोजन

मालवण दि प्रतिनिधी
मालवण येथील युवा सामाजिक कार्यकर्ते सौरभ श्रीकृष्ण ताम्हणकर यांच्या पुढाकाराने मोफत ‘आयुषमान कार्ड विशेष मोहीम अंतर्गत आयोजित शिबिराला नागरिकांचा उत्तम प्रतिसाद लाभला. यावेळी ६१ जणांना आयुषमान कार्डचे वितरण करण्यात आले.

आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत विविध वैद्यकीय उपचारांचा लाभ व वैद्यकीय विमा संरक्षण देण्यात येते. यासाठी आयुषमान कार्ड असणे आवश्यक आहे. यासाठी मोफत आयुषमान कार्ड विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. या अंतर्गत मालवण मधील युवा सामाजिक कार्यकर्ते सौरभ ताम्हणकर यांच्यावतीने मालवण सोमवार पेठ येथील श्रीकृष्ण ताम्हणकर फिश सेंटर ऑफिस मध्ये आयुषमान कार्ड वितरण शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात नागरिकांना आवश्यक कागदपत्रांच्या आधारे आयुषमान ई कार्ड वितरण करण्यात आले. या शिबिराचा ६१ नागरिकांनी लाभ घेतला.

या शिबिरासाठी डॉ. प्रवीण गोरुले व कर्मचाऱ्यांचे सहकार्य लाभले. यावेळी सौरभ ताम्हणकर यांच्यासह राकेश सावंत, निशय पालेकर, फ्रान्सिस फर्नांडिस, केतन कोचरेकर, रुपेश कांबळी, अमोल ताम्हणकर, सुनील ताम्हणकर, मिलन ताम्हणकर आदी व इतर उपस्थित होते.

You cannot copy content of this page