देवगड ग्रामीण रूग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डाॅ.संदीप भगत यांची नाशिक येथे प्रशासकीय बदली

⚡देवगड ता.१७-: देवगड ग्रामीण रूग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डाॅ.संदीप भगत यांची नाशिक येथे प्रशासकीय बदली झाली आहे.रूग्णांसाठी चांगली सेवा देणारे डाॅक्टर म्हणून त्यांची ओळख हाेती.
गेली साडेसहा वर्षे डाॅ.भगत हे देवगड ग्रामीण रूग्णालयात वैद्यकीय अधिकारी म्हणून कार्यरत हाेते.काही काळ त्यांच्याकडे वैद्यकीय अधिक्षकपदाचाही कारभार हाेता.एक सेवाभावी, चांगले वैद्यकीय अधिकारी म्हणून त्यांची ख्याती हाेती.त्यांचा कार्यकाळात रूग्णालयाची ओपीडीही वाढली.डाॅ.भगत यांच्या कार्यकाळात रूग्णांचा ओढाही रूग्णालयात वाढला हाेता.2015 साली ते देवगड ग्रामीण रूग्णालयात रूजू झाले.2016 ध्ये त्यांची देवगड रूग्णालयात कायस्वरूपी वैद्यकीय अधिकारी म्हणून नियुक्ती झाली.

अस्थिराेग तज्ञ म्हणून ते सेवेत कार्यरत हाेते. यामुळे दर बुधवारी ओराेस ग्रामीण रूग्णालयात अस्थीराेग तज्ञ म्हणून सेवा देत हाेते.

तसेच कोरोना काळात देखील देवगड ग्रामीण रुग्णालयात डेडिकेटेड कोविड हेल्थ सेंटर सुरू करून रुग्णांना देखील चांगली सेवा देण्याचा प्रयत्न केला कोरोना काळात स्वतःला देखील कोरोना झाला असताना देखील कोरोनावर मात करून पुन्हा एकदा रुग्णांच्या सेवेत दाखल होऊन कोरोनाची भीती रुग्णांपासून कशी लांब करता येईल यासाठी नेहमीच ते सातत्याने प्रयत्न करत होते डॉक्टर भगत यांचा रुग्णांबरोबर असलेला मनमिळाऊ स्वभावामुळे अनेक रुग्ण त्यांच्याजवळ गेल्यानंतरच बरे होत असतात गरिबांचा डॉक्टर म्हणून त्यांची नेहमीच आपली वेगळी ओळख निर्माण केली होती

You cannot copy content of this page