मालवण – तारकर्ली देवबाग मार्गासाठी चार मिनीबस उपलब्ध व्हाव्यात – सुरेश बापार्डेकर

⚡मालवण ता.१६-: मालवण तारकर्ली देवबाग मार्गासाठी मालवण आगाराला चार मिनी बस उपलब्ध व्हाव्यात, जेणे करून मालवण बाजारपेठ मार्गे तारकर्ली बंदर, विठ्ठल मंदिर, देवबाग या मार्गावरून मिनीबस प्रवाश्यांच्या सेवेत राहतील. प्रवाशांची गरज लक्षात घेऊन याबाबत विचार व्हावा, अशी मागणी तारकर्ली येथील सामाजिक कार्यकर्ते तथा भारतीय जनता पार्टी कोकण विकास आघाडी मुंबईचे सचिव सुरेश बापर्डेकर यांनी मुख्यमंत्री तथा परिवहन मंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे निवेदनाच्या माध्यमातून केली आहे.

मालवण तालुक्यातील निसर्गरम्य पर्यटन दृष्टया विकसित तारकर्ली देवबाग येथे गाड्यांची आणि पर्यटकांची मोठ्या प्रमाणात वर्दळ नेहमीच चालू असते. अशावेळी वाहतुकीची कोंडी होत असल्याने मोठी बस पूर्ण देवबाग पर्यंत पोहोचत नाही. मध्येच तारकर्ली येथे वळून मागे जावे लागते. यामुळे गावातील प्रवासी, शाळा, कॉलेज इतर कोर्सेस याकरिता जाणारे विद्यार्थी व अन्य प्रवाशी यांना समस्यांना सामोरे जावे लागले. अशावेळी मिनी बस उपलब्ध झाल्यास सोईकरिता फेऱ्या चालू राहून सर्वांची होणारी गैरसोय दूर होईल. मार्गावरील वायरी भुतनाथ, देवली काळेथर, देवबाग मोबार पर्यत भागालाही फायदा होईल. तरी याबात लवकरात लवकर कार्यवाही व्हावी, असे सुरेश बापर्डेकर यांनी निवेदनात म्हटले आहे.

You cannot copy content of this page