आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप

⚡मालवण ता.१६-: शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या युवासेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत युवतीसेना विस्तारक रुची विनायक राऊत यांच्या वतीने मालवण येथील डॉ. एस. एस. कुडाळकर हायस्कूल मधील प्राथमिक शाळेच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे तालुकाप्रमुख हरी खोबरेकर यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी मुख्याध्यापिका नंदिनी साटलकर, अजय शिंदे, सुनील आचार्य, महादेव नाईक, शिल्पाकिरण साटम, सारिका शिंदे, अशोक आठलेकर या शिक्षकांसह पक्षाचे शहरप्रमुख बाबी जोगी, युवतीसेना तालुका संघटक निनाक्षी शिंदे, युवासेना देवबाग विभागप्रमुख चंदू खोबरेकर, उपशहरप्रमुख उमेश मांजरेकर, तपस्वी मयेकर, अक्षय भोसले, करण खडपे आदी पदाधिकारी उपस्थित होते.

You cannot copy content of this page