कुडाळ, प्रतिनिधी
कुडाळ तालुक्यातील तुळसुली तर्फ माणगाव बुडक्याची वाडी येथे आज सकाळी राहत्या घरासमोरील खळ्यामध्ये नाईक यांच्या घरातील कुत्र्याचा जवळ सरपटणारा प्राणी आल्याने त्याला कुत्र्याने अडवून ठेवले होते. त्यावेळी दत्ताराम शंकर नाईक ( वय ५२) हे त्या सापाजवळ जाऊन त्याला हाकलण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी त्या सरपटणाऱ्या जनावराने त्यांच्या हाताला दंश केला. त्यानंतर त्यांच्या उजव्या हातात सूज आली. त्यामुळे दत्ताराम यांना कुडाळ ग्रामीण रुग्णालय येथे दाखल करण्यात आले. त्यानंतर अधिक उपचारासाठी ओरोस येथील जिल्हा रुग्णालय येथे दाखल केले असता त्यांचे उपचारादरम्यान निधन झाले. या घटनेची खबर मयत दत्ताराम नाईक यांचे भाऊ शशिकांत शंकर नाईक ( वय ४२) यांनी कुडाळ पोलीस ठाण्यात दिली.
