गॅस पाईप लाईन खोडाईचे काम पाडले बंद

उपसरपंच जावेद खतीब, सदस्य बाळू सावंत झाले आक्रमक

⚡बांदा ता.१५-: स्थानिक ग्रामपंचायत प्रशासनाने वेळोवेळी सूचना देऊनही गॅस पाईपलाइनचे काम करणारा ठेकेदार योग्य प्रकारे काम करत नसल्याने बसस्थानक नजीक सुरू असलेले काम बांदा उपसरपंच जावेद खतीब व ग्रामपंचायत सदस्य बाळू सावंत यांनी बुधवारी सायंकाळी सदरचे काम बंद पाडले. गेले चार दिवस सदरचे काम सुरू असून ठेकेदार मनमानी करत काम असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला. यापुढे एक फूट जरी रस्ता खणला तर सामान जप्त करण्यात येईल असा सज्जड दम ठेकेदाराला देण्यात आला.

गेले काही दिवस बांदा शहरात महामार्गानजीक गॅस पाइपलाईन काम सुरू आहे. सदरचे काम सुरू करताना स्थानिक ग्रामपंचायत प्रशासनाने ठेकेदाराला बोलावून पावसाळ्या अगोदर काम पुर्ण करून रस्ता पुन्हा सुस्थितीत करावा अश्या सूचना देण्यात आल्या होत्या . त्यावेळी सदर ठेकेदाराने ते मान्यही केले होते मात्र प्रत्यक्षात मात्र तसे होताना दिसत नाही सद्यस्थितीत बांदा बसस्थानक नजीक काम सुरू असून सर्विस रोड पूर्ण खणून घातला आहे. या ठिकाणी दुकाने असून रस्ता बंद असल्याने त्यांच्या व्यवसायावर प्रचंड परिणाम ऐन सीझनमध्ये झाला.
उद्या पासून शाळा सुरू होणार असून सदरचा ठेकेदार मागील रस्ता उखडून घालून तो सुस्थितीत न करता पुढचे काम सुरू करत आहे त्या पश्वभूमीवर बांदा ग्रामपंचायत उपसरपंच जावेद खतीब व ग्रामपंचायत सदस्य बाळू सावंत यांनी सदरचे काम बुधवरी सायंकाळी बंद पाडले जोपर्यंत मागील रस्ता नीट करत नाहीत तोपर्यंत एकही फूट पुढे काम होता नये असा सज्जड दम भरला.उद्या पासून शाळा चालू होणार असून जर महामार्गाचा सर्विस रोड बंद झाला तर शाळकरी मुलांनी द्रुतगती महामार्गावरून गाडी चुकीच्या मार्गांनी हाकावे का? असा सवाल बाळू सावंत यांनी केला. गॅस पाइपलाईनच्या कामामुळे जर एखादा अपघात झाला तर आम्ही गप्प बसणार नाही असे ठणकावले. एखादी जीवित हानी झाल्यास आपण जबाबदार रहाल असे त्यांना ठणकावण्यात आले.

You cannot copy content of this page