मोदी @ ९ अंतर्गत बांदा भाजपचा उपक्रम
⚡बांदा ता.१५-: मोदी @ 9 या कार्यक्रमाअंतर्गत बांदा मंडलाचा जेष्ठ नागरिकांबरोबर संवाद कार्यक्रम शुक्रवार दिनांक 16 रोजी सायंकाळी ५ वाजता येथील आनंदी मंगल कार्यालयात आयोजित करण्यात आला आहे.
या कार्यक्रमास भाजपा महाराष्ट्र प्रदेशचे उपाध्यक्ष तथा जिल्हा बँक उपाध्यक्ष अतुल काळसेकर, राजापूर लोकसभा प्रमुख माजी आमदार प्रमोद जठार, जिल्हाध्यक्ष राजन तेली आदी उपस्थित राहणार आहेत. तरी भाजपचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच ज्येष्ठ नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन बांदा भाजपाच्यावतीने करण्यात आले आहे.
