जिल्हाध्यक्ष आबा खवणेकर यांनी दिले पुष्पगुच्छ
सावंतवाडी तहसीलदार”पदी” कर्तव्यदक्ष अधिकारी श्रीधर पाटील यांची नियुक्ती झाल्याने महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघटनेच्या वतीने जिल्हाध्यक्ष आबा खवणेकर यांनी श्री पाटील यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत व अभिनंदन केले.यावेळी महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघटनेचे जिल्हा सदस्य मिलिंद धुरी,सदस्य आनंद कांडरकर यावेळी उपस्थित होते.
कर्तव्यदक्ष डॅशिंग अधिकारी श्रीधर पाटील यांनी यापुर्वी मालवण तहसीलदार म्हणून चांगले काम केले आहे. मालवण मध्ये असताना श्री पाटील यांनी काही महिन्यांपुर्वी अनधिकृत वाळूची वाहतूक करणाऱ्या मालवण देवली येथे एकाच दिवशी तब्बल २८ डंपरवर अचानक धडक कारवाई करून,लाखो रूपये महसूल मिळवून दिला.त्याचबरोबर तालुक्यात त्यांनी अनधिकृत वाळूच्या डंपरवर धडक कारवाई सुरूच ठेवून ७६ अनधिकृत वाळूचे डंपर पकडून शासनाला १ कोटी २२ लाख रुपये महसूल शासनाला देण्यात त्यांचा मोठा सिंहाचा वाटा आहे.
श्रीधर पाटील यांना कार्यक्षम अधिकारी म्हणून पाहिलं जात.सर्वसामान्यांची कामे जलद गतीने होण्यावर नेहमी त्यांचा भर असतो. त्यांच्या नेमणूकीने सर्वसामन्यांतून समाधान व्यक्त केले जात आहे.
