माजी नगराध्यक्ष साळगावकर यांनी केली पाहणी;उपाययोजांबाबत अधिकाऱ्यांना दिल्या सूचना
⚡सावंतवाडी ता.१५-: सावंतवाडी नगरपरिषद येथील खासकिलवाडा येथे फूट ब्रिज उंची वाढविल्यामुळे थोड्याशा पावसात पाणी साठत आहे. यामुळे स्थानिक नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. या भागात सतीश पाटणकर, माणगावकर तसेच खानोलकर यांची घरे आहेत. लोकांच्या तक्रारीमुळे माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी माजी आरोग्य सभापती सुरेश भोगटे यांच्या समावेत या भागाची नगरपरिषद अधिकारी शिवप्रसाद कुडपकर व मनोज राऊळ यांच्या समवेत पाहणी केली.
यावेळी नगरच्या अधिकाऱ्यांना या भागातील पाणी साठणार नाही, यासाठी काय करता येईल ? ते करण्याच्या सूचना केल्या आहेत. स्थानिक नागरिकांनी यावेळी आपल्या समस्या माजी नगराध्यक्ष साळगावकर यांच्याकडे मांडल्या.
