भटवाडी शाळा नं ६ चा उपक्रम:माजी नगरसेविका दिपाली भालेकर यांच्या उपस्थितीत करण्यात आले पुस्तकांचे वितरण
⚡सावंतवाडी ता.१५-: कै. लक्ष्मीबाई मुरारी माधव आदर्श पुरस्कार प्राप्त विद्यालय भटवाडी शाळा नं ६ मध्ये आज शाळेच्या पहिल्या दिवशी मा. नगरसेविका दिपाली भालेकर यांच्या प्रमुख उपस्तिथीत नवोगत मुलांचे औक्षण करून स्वागत व शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तके वाटप करण्यात आली.
यावेळी नगरसेविका दिपाली भालेकर, अध्यक्षा अनिशा राणे, शिक्षणातज्ज्ञ दिलीप भालेकर, मुख्याध्यापिका सायली लांबर, उपाध्यक्ष समीक्षा खोचरे, सहाय्यक शिक्षिका गीता सुतार आदी मान्यवरांनी नवोगत विद्यार्थ्यांचे औक्षण करून स्वागत केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
यावेळी राजू भिसे, रेखा डंकी, सौ. गीता चव्हाण, सौ. साळुंखे, अविनाश खोरागडे, सौ. शेख, उत्तम दळवी, बालवाडी शिक्षिका सौ. गावडे आदी पालक उपस्थित होते.
मान्यवरांचे स्वागत व प्रास्ताविक शाळेच्या मुख्याध्यापिका सायली लांबर यांनी केले व आभार सहाय्यक शिक्षिका गीता सुतार यांनी मानले.
