ठाकरे शिवसेना गटाचे कुडाळ शिक्षण विभागासमोर आंदोलन
⚡कुडाळ ता.१५-: सिंधुदुर्ग जिल्ह्यातील १२१ शाळांमध्ये शिक्षक नसल्याने विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक जीवनावर परिणाम होणार आहे. त्यामुळे प्रत्येक शाळेत शिक्षक उपलब्ध होऊन विद्यार्थ्यांची शैक्षणिक समस्या दूर व्हावी, या मागणीसाठी ठाकरे शिवसेनेच्या वतीने आज कुडाळ पंचायत समिती शिक्षण विभाग कार्यालयासमोर आंदोलन छेडण्यात येणार आहे. कुडाळ तालुक्यात जि.प.च्या १८ शाळा शून्य शिक्षकी आहेत. याठिकाणी त्वरीत शिक्षक उपलब्ध करण्यासाठी या अंतर्गत कुडाळ पंचायत समिती कार्यालयासमोर आंदोलन छेडून शासनाचे लक्ष वेधण्यात आले.
यावेळी शिंदे – फडणवीस सरकार तसेच शिक्षणमंत्री केसरकर यांच्या विरोधात घोषणबाजी करण्यात आली. त्यानंतर गट शिक्षणाधिकारी संदेश किंजवडेकर यांना ठाकरे शिवसेनेकडून निवेदन देण्यात आले.
हे आंदोलन ठाकरे शिवसेना तालुकाप्रमुख राजन नाईक यांच्या नेतृत्वाखाली छेडण्यात आले. यावेळी उपजिल्हाप्रमुख अमरसेन सावंत, युवासेना जिल्हाप्रमुख मंदार शिरसाट, संतोष शिरसाट, मिलिंद नाईक, महिला जिल्हाप्रमुख जान्हवी सावंत,
स्नेहा दळवी, सई काळप, श्रेया गवंडे, श्रुती वर्दम, सचिन काळप, बबन बोभाटे, अतुल बंगे, बाबी गुरव, गोट्या चव्हाण, मथुरा राऊळ, पूनम पवार, वैशाली पावसकर, मिलिंद नाईक, बाळू पालव, जयभारत पालव यांच्यासहित ठाकरे शिवसेनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
