श्री .सुरेश गवस ;सेंट्रल इंग्लिश स्कूलमध्ये विद्यार्थ्यांचा गौरवसोहळा …
⚡सावंतवाडी ता.१५-: सावंतवाडी मर्कझी जमात ,बॉम्बे संचलित सेंट्रल इंग्लिश स्कूलचा सन २०२२- २३ वर्षाचा इयत्ता दहावीचा निकाल १००% लागला असून सर्व विद्यार्थी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले . या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा आज आयोजित करण्यात आला होता .
या गुणगौरव सोहळ्याला कार्यक्रमाध्यक्ष म्हणून शालेय समितीचे सल्लागार श्री . सुरेश गवस, ईशप्रेमालया कॅन्सर सेंटरच्या सिस्टर डेलिसा , मुस्लिम हेल्थ अँड वेल्फेअर फाउंडेशन संस्थेचे अध्यक्ष श्री . शोएब बेग आणि वैद्यकीय क्षेत्रात सेवा बजावणारे डॉ . रामचंद्र पित्रे , संस्था सहसचिव श्री.सुलेमान बेग ,सदस्य श्री . रफिक शेख , श्री मुश्ताक बागवान, प्रशालेच्या मुख्याध्यापिका श्रीम. निर्मला
हेशागोळ , सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी , गुणवंत विद्यार्थी व पालक उपस्थित होते .प्रशालेच्या मुख्याधापिका श्रीम. निर्मला हेशागोळ यांनी पुष्प देऊन उपस्थित मान्यवरांचे स्वागत केले .
सहाय्यक शिक्षिका श्रीम. मारिया पिंटो यांनी विद्यार्थ्यांच्या निकालाचे वाचन केले. सर्व विद्यार्थ्यांना गुणपत्रक व पुष्प देऊन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. अनुक्रमे प्रथम तीन विद्यार्थी कु . काशिराम पालव , कु . सिद्धी पुरोहीत , कु . राज माणगावकर यांना पुष्पगुच्छ व धनादेश देऊन प्रशालेच्यावतीने त्यांचा गौरव करण्यात आला. विद्यार्थ्यांमधून कु . काशिराम पालव, कु. सिद्धी पुरोहीत, कु. प्राची सावंत, कु.राफा बेग , कु . जुनैद शेख यांनी आपले मनोगत व्यक्त केले . पालक प्रतिनिधी म्हणून श्रीम. मनिषा पालव यांनी आपल्या मनोगतातून विद्यार्थ्यांना भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या .
सावंतवाडी मर्कझी जमात बॉम्बे संस्थेचे सहसचिव श्री. सुलेमान बेग यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे व त्यांना मार्गदर्शन करणाऱ्या प्रशालेच्या मुख्याध्यापिका व सर्व शिक्षिका यांचे कौतुक करत विद्यार्थ्यांना भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या . प्रशालेच्या मुख्याध्यापिका श्रीम. निर्मला हेशागोळ यांनीही आपले मनोगत व्यक्त केले व यशस्वी विद्यार्थ्यांना भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या. सिस्टर डेलीसा यांनी संस्थेचे ,शिक्षकांचे व विद्यार्थ्यांचे विशेष कौतुक करत शुभेच्छा दिल्या .डॉ . रामचंद्र पित्रे यांनी यशस्वी व्यक्ती घडण्यापेक्षा चांगला माणूस बना , तसेच समाजातील वास्तविक परिस्थितीची जाणीव ठेवा , असे बहुमोल मार्गदर्शन केले .तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री . सुरेश गवस यांनी मनावर नियंत्रण मिळवा व बुद्धीने विचार करून योग्य निर्णय घ्या , असे मौलिक विचार व्यक्त करत विद्यार्थ्यांना भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या .
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन शिक्षिका श्रीम. स्मृती गवस यांनी केले व श्रीम. श्रुती गोडकर यांनी आभार मानले .
