रक्तदात्यांचा सावंतवाडीत पार पडला भव्य सत्कार

सिंधू रक्तमित्र प्रतिष्ठान व विशाल सेवा फाउंडेशनचे आयोजन;विशाल परब यांचा करण्यात आला सत्कार

⚡सावंतवाडी ता.१५-: सावंतवाडी सिंधु रक्तमित्र प्रतिष्ठान व विशालसेवा फाउंडेशन यांच्या विद्यमाने आयोजित रक्तदात्याच्या भव्य सत्कार समारंभ पार पडला. यावेळी विशाल सेवा फाउंडेशन चे अध्यक्ष व भाजपचे युवा नेते श्री विशाल परब यांची प्रमुख उपस्थिती लाभली यावेळी सिंधु रक्तमित्र प्रतिष्ठान च्या वतीने श्री विशाल परब यांचा शाल व श्रीफ नारळाचे रोप देऊन सत्कार करण्यात आला.

यावेळी श्री प्रकाश तेंडुलकर, एकनाथ चव्हाण,सौ भाग्यश्री भोसले व सावंतवाडी नगरीचे माजी नगराध्यक्ष श्री संजू परब,भाजप नेते श्री लखनराजे भोसले व इतर मान्यवर उपस्थित होते.

यावेळी श्री विशाल परब यांनी संस्थेला भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या

You cannot copy content of this page