मालवण तालुक्यातील बहुसंख्य तरुणांचा मनसेत प्रवेश

⚡मालवण ता.१४-:
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत मालवण शहर व तालुक्यातून बहूसंख्य युवकांनी मनसे सरचिटणीस, माजी आमदार परशुराम उपरकर यांच्या उपस्थितीत प्रवेश केला.

मनसेच्या मालवण तालुका कार्यालयात हा पक्ष प्रवेश पार पडला. यामध्ये मंगेश पुजारे, अक्षय परब,मनीष पूजारे अभिषेक परब, तुषार पुजारे, प्रसाद पुजारे, मंदार सावंत, प्रसाद परब, वरक,अथर्व गोलतकर, प्रणय साटम,अभिषेक साईल, प्रणय वायंगणकर, प्रशांत वायंगणकर, तुषार जुवेकर, अविनाश आचरेकर, सुरज मांजरेकर, महादेव धुरत,सिद्धेश घोगळे, सिद्धेश परब ,कुनाल माळवदे, विघ्नेश शिरोडकर, सुरज मांजरेकर, तेजस खोबरेकर, स्वर पेंडुरकर,चिन्मय कांबळी, कल्पेश मसुरकर, लुईस फर्नांडिस , सिद्धेश वायंगणकर, कुणाल मालवणकर आदींनी मनसे पक्षात प्रवेश केला. या सर्वाना गुलाब पुष्प देऊन परशुराम उपरकर यांनी पक्षात स्वागत केले.

यावेळी मनसेचे विनोद सांडव अमित इब्रामपूरकर, प्रीतम गावडे,विल्सन गिरकर, विशाल ओटवणेकर, रामनाथ पराडकर , उदय गावडे, प्राजक्ता पार्टे , विवेक तोंडवळकर, नितीन खानोलकर प्रशांत पराडकर, संदीप लाड आदी व इतर कार्यकर्ते उपस्थित होते.

You cannot copy content of this page