वायरमन म्हनून सिद्धेश धुत्रे यांना नियुक्तीपत्र प्रदान
⚡कणकवली ता.१४-:
कलमठ गावासाठी स्वतंत्र वायरमन देण्याचे आश्वासन विद्युत मंडळाचे कार्यकारी अभियंता बाळासाहेब मोहिते यांनी दिले होते या आश्वासनाची पूर्तता करण्यासाठी कलमठ सरपंच संदीप मेस्त्री यांनी पाठपुरावा करत अखेर कलमठ गावासाठी सिद्धेश धुत्रे यांना नियुक्तीपत्र देण्यास भाग पाडले असून सदरचे नियुक्तीपत्र देण्यात आले आहे. कलमठ सरपंच संदीप मिस्त्री यांच्या पाठपुरावा यशस्वी ठरला आहे.
आमदार नितेश राणे व वीज कंत्राटी कामगार नेते अशोक सावंत यांच्या माध्यमातून सरपंच संदीप मेस्त्री यांनी सिद्धेश धुत्रे यांचे वायरमन म्हणून नियुक्त पत्र आणून महावितरण कडे सुपूर्द केले दिले ,श्री गिरीश भगत यांच्या हस्ते वायरमन सिद्धेश धुत्रे याला पत्र देण्यात आले. यावेळी उपव्यवस्थापक प्रकाश शिंदे, आबा कोरगावकर उपस्थित होते.
