प्रेमदया प्रतिष्ठानचे अध्यक्ष हनुमंत सावंत यांनी दिला इशारा
⚡कणकवली ता.०९-: -कणकवली तालुक्यातील कळसुली बीएसएनएल च्या टॉवर मध्ये वारंवार बिघाड होत असल्याने सध्या मोबाईल नेटवर्कचा बोजवारा उडाला असून, इंटरनेट सेवा कोलमडली आहे. तसेच कॉलिंगमध्येही आवाज तुटणे व अचानक कॉल कट होणे असे प्रकार वारंवार घडत असल्याने कळसुली गावातील नागरिक त्रस्त झाले आहेत.
कळसुलीमध्ये बीएसएनएल व्यतिरिक्त कोणत्याही टॉवरचे गावात नेटवर्क नसल्याने शासकीय सेवा कोलमडली आहे. येत्या ८ दिवसात कळसुली गावातील बीएसएनएल सेवा सुरळीत न झाल्यास प्रेमदया प्रतिष्ठानचे अध्यक्ष हनुमंत सावंत यांनी तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा बीएसएनएल कंपनी ला दिला आहे.
