पाऊस न झाल्यास सावंतवाडी वासियांना मोठ्या समस्येला जावे लागणार सामोरे;माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी व्यक्त केली भीती
⚡सावंतवाडी ता.०८-:येथील शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या पाळणेकोंड धरणाने तळ गाठला आहे. मृग नक्षत्रात वेळेत पाऊस झाला नाहीतर सावंतवाडी शहरवासीयांना पाणी प्रश्नाच्या मोठ्या समस्येला सामोर जावं लागण्याची भीती माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी व्यक्त केली आहे.

काही वर्षापूर्वी अशीच परिस्थिती निर्माण झाली होती. परंतु 15 जुलै पर्यंत कमी अधिक दाबाने पाणीपुरवठा शहरांमध्ये होत होता, असे साळगावकर यांनी म्हटल आहे.
