आंबोली घाटात लूटमार बाबत कोणतीही सत्यता नाही
आंबोली,ता.८: अनिल चव्हाण. :गोव्यातून आंबोली घाटात 30 मे रोजी सशस्त्र टोळीकडून रात्री लुटण्याचा प्रकार ,गोव्यात रात्रीचे येताना सावधान अशा प्रकारची बातमी एक वृत्तपत्राने दिली आणि सोशल मीडिया मध्ये वायरल होत आहे.मात्र सदर बातमीबाबत कोणतीही सत्यता सिद्ध होत नाही.पोलीस याची शहानिशा करत आहेत. आंबोली घाटातून सशस्त्र टोळीकडून रात्री १५ लोकांकडून लुटण्याचा प्रकार अशी बातमी प्रसारित गोव्यात केली आहे.
सदर घटनेची शहानिशा पोलीस करत आहेत मात्र त्यात सत्यता वाटत नाही.आंबोली घाटातुन गोव्याला जाताना दाणोली मध्ये तपासणी साठी पोलीस आहेत,पुढे इन्सुलि मध्ये,त्यापुढे बांदा येथे,तेथून पुढे गोवा पत्रादेवी येथे चेक नाका आहे त्याठिकाणी त्यांनी का कळवले नाही.तसेच १०० नंबर वर संपर्क साधू शकले असते, शिवाय आंबोली पोलीस स्थानकात का सांगितले नाही.गाडी क्रमांक द्यावेत आंबोली आणि दाणोली पोलीस कॅमेरा चेक करू शकले असते.जी बातमी घटना कोणी दिली तीगाडी तरी येथुन पास झाली तरी का याचा देखील नंबर दिसेल. शिवाय जी बातमी प्रसारित केली त्यावरचा नंबर लागत नाही कव्हरेज क्षेत्राबाहेर येतो.त्यामुळे ही बातमी कोणी प्रसारित केली त्याची पोलीस शहानिशा करत आहेत. आंबोली घाटात अशी कधी घटना कधी घडलेली नाही.घाटात वाहतूक रात्रभर सुरू असते.आंबोलीत अशा घटना घडलेल्या या पूर्वी पण नाहीत. कर्नाटक सीमेवरील घाटातील असा प्रकार असू शकतो असे काही वाहतूक दारांचे मत आहे.. मात्र आंबोली घाटातून दररोज वाहतूक करणार्यांनी याबाबत आश्चर्यक व्यक्त केले आहे. वर्षा पर्यटन काळात आंबोलीत इथल्या पर्यटनावर परिणाम घडवण्यासाठी दरवर्षी पावसाळ्यात असे प्रकार आंबोली च्या नावाने फॉरवर्ड होत असतात. ही घटना सुद्धा आंबोली च्या नावाने जोडली जाण्याचा प्रकार आहे.आंबोली पोलिसांनी सदर प्रकरणाची शहानिशा करत असल्याबाबत पोलीस नाईक दीपक शिंदे हवालदार दत्ता देसाई यांनी सांगितले.
सदर नंबर वर संपर्क झाला असता त्याव्यक्तीने कबुली दिली आहे,की आपण सातारा येथील आहे, 6 वाजता आंबोलीत होतो,आपण कोल्हापूर वरून गोव्यात गोवा वेस वरून कर्नाटक सीमेवरून जाताना एक घाट लागतो त्या घाटात अशी घटना घडली असे व्हाट्सअप वर लेख लिहिले मात्र आंबोली घाट असे कुठेही लिहिलेले नाही. अशी त्याने कबुली दिली मात्र आंबोली नाव त्यात घालून बातमी एक वृत्तपत्राने दिली आणि समाजमाध्यमात देखील वायरल होत आहे. आंबोली भागातून याबाबत संताप व्यक्त होत आहे.
