⚡मालवण ता.१३-: बजेट योजने अंतर्गत मंजूर केलेल्या ओझर रेवंडी भद्रकाली मंदिर ते कोळंब रस्ता कामाचा शुभारंभ आमदार वैभव नाईक यांच्या उपस्थितीत रेवंडी सरपंच अमोल वस्त यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आला. या रस्त्याच्या कामासाठी बरीच वर्ष ग्रामस्थांकडून मागणी करण्यात येत होती. यासाठी आम. वैभव नाईक यांनी बजेट योजने अंतर्गत सुमारे १० लाख रुपये निधी उपलब्ध करून प्रत्यक्ष कामास सुरुवात करण्यात आली. यावेळी रेवंडी ग्रामस्थांनी आम. नाईक यांचे आभार मानले. आम. नाईक यांनी यापुढील जी विकास कामे असतील ती सुद्धा पूर्ण करू, असा विश्वास व्यक्त केला.
यावेळी शिवसेना- उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे तालुकाप्रमुख तथा माजी जिल्हा परिषद सदस्य हरी खोबरेकर, सरपंच अमोल वस्त, उपसरपंच श्रद्धा वेंगुर्लेकर, शाखाप्रमुख संजय कांबळी, उपशाखप्रमुख सुरेश गावडे, माजी सरपंच युवराज कांबळी, संतोष कांबळी, प्राजक्ता कांबळी, विजय कांबळी, भावेश कांबळी, सुधीर कांबळी, संजय निवतकर, दिलीप मोर्वेकर, संतोष मुणगेकर, महेश कांबळी, प्रथमेश कांबळी, रवींद्र कांबळी, विनोद कांबळी, अनिरुद्ध कांबळी, सुधीर मोर्वेकर, संदीप धुळे, गिरीश कांबळी आदी उपस्थित होते.
