कर्नाटक तो झाकी है… भारत अभी बाकी है !

मालवणात काँग्रेसकडून कर्नाटक विजयाचा आनंद साजरा

⚡मालवण ता.१३-: कर्नाटक तो झाकी है… भारत अभी बाकी है… राहुल गांधी तुम अगे बढो, हम तुम्हारे साथ है… अशा घोषणा देत आज मालवणच्या भरड नाक्यावर राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी कर्नाटक विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने मिळविलेल्या विजयाबद्दल जल्लोष केला. जोरदार घोषणा देतानाच फटाके फोडून व पेढे वाटून काँग्रेस कार्यकर्त्यांनी आनंद साजरा केला.

कर्नाटक विधानसभा निवडणुकीत राष्ट्रीय काँग्रेस पक्षाने भाजपचा पराभव करीत विजय मिळविल्याने सर्वत्र काँग्रेस पदाधिकारी कार्यकर्ते जल्लोष करत आहेत. या पार्श्वभूमीवर मालवण शहरातही काँग्रेस पदाधिकारी कार्यकर्ते यांनी एकत्र येत भरड नाका येथे जल्लोष केला. यावेळी विजयाच्या जोरदार घोषणा देत फटाके फोडून पेढे वाटण्यात आले. यावेळी राष्ट्रीय काँग्रेसचे प्रांतिक सदस्य साईनाथ चव्हाण, जिल्हा सरचिटणीस अरविंद मोंडकर, ओबीसी सेल जिल्हाध्यक्ष बाळू अंधारी, तालुकाध्यक्ष मेघनाद धुरी, सेवादल जिल्हाध्यक्ष श्रीकृष्ण तळवडेकर, तालुकाध्यक्ष मेघनाद धुरी, युवक माजी अध्यक्ष देवानंद लुडबे, श्रेयस माणगावकर, मधुकर लुडबे, पराग माणगावकर, संदेश कोयंडे, बाबू गांवकर, योगेश्वर कुर्ले, गणेश पाडगावकर, सरदार ताजर, कुडाळ- मालवण विधानसभा मतदारसंघ पदाधिकारी पल्लवी तारी, लक्ष्मीकांत परुळेकर, राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हा सरचिटणीस प्रमोद कांडरकर, दिलीप तळगांवकर व अन्य उपस्थित होते.

You cannot copy content of this page