केसरकारांना विकास जमत नाही असे म्हणतात तर;तेली तुम्ही करू दाखवा…

रूपेश राऊळ यांचे आवाहन;तर केसरकरांचा खरा चेहरा जनतेसमोर आणणा

सावंतवाडी ता.०९-: जी विकास कामे केसरकरांना जमत नाही असे म्हणतात तर;तेलीनी करून दाखवावी, असे खुल्ले आवाहन ठाकरे गटाचे तालुकाप्रमुख रुपेश राऊळ यांनी केले आहे. दरम्यान दिपक केसरकर आता खासदारकी किंवा आमदारकीची स्वप्ने पाहत आहेत. त्यासाठी ज्या ठिकाणी केसरकर प्रेस किंवा सभा घेणार त्या ठिकाणी जाऊन केसरकरांचा खरा चेहरा जनते समोर आणणार, असा इशाराही रूपेश राऊळ यांनी केसरकर यांना दिला आहे.ते सावंतवाडीत आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.

ते म्हणाले, मंत्री केसरकर आणि भाजपा जिल्हाध्यक्ष राजन तेली आज विकास कामावरून भांडत आहेत मात्र ज्या विकास कामावरून ते आरोप प्रत्यारोप करत आहे ते विकास कामे महाविकास आघाडीच्या काळात उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना मंजूर झालेली कामे आहेत आज दोघेही सत्तेत असताना एकमेकाची हिम्मत काढत आहेत मात्र या भांडणात त्यांनी जनतेच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष झाले आहे. आज केसरकर यांची परिस्थिती किती केविलवाणी झाली आहे हे त्यांच्या पत्रकार परिषदेतून दिसून येते. आज दोघेही सत्तेत असताना आमदारकीसाठी लाचार झालेले आहात हे जनतेला कळून चुकले आहे त्यामुळे येणाऱ्या काळात जनता योग्य निर्णय घेईल.राजन तेली यांनीही आजपर्यंत अनेक आश्वासने येथील जनतेला दिली कबुलातदार गावकर तसेच रोजगार संदर्भात त्यांनी वेळोवेळी वक्तव्य केली आहेत त्यामुळे जी विकास कामे केसरकर करू शकले नाहीत ती तेली यांनी तरी करून दाखवावी. आणि केसरकर यांनी रडगाणे सोडून जनतेच्या विकासाकडे पहावे.


श्री राऊळ पुढे म्हणाले, आज केसरकर मतदार संघामध्ये फिरत आहेत अलीकडेच त्यांनी हवाई पाहणी केली मात्र ते जनतेच्या विकासासाठी नाही तर स्वतःच्या घराचा विकास करण्यासाठी फिरत आहे अशी जनता बोलत आहे. विकासाची भाषा करणाऱ्या केसरकारांनी आता विकासाच्या मोठमोठ्या बाता करण्यापेक्षा स्वतःच्या खात्याचा साधा डिएड बी एड चा प्रश्न तरी सोडवावा. त्यांच्यात हिंमत असेल तर त्यांनी कै भाईसाहेब सावंत माजी राज्यमंत्री प्रवीण भोसले यांनी ठिकाणी केलेल्या ठोस विकासासारखा विकास करावा.


You cannot copy content of this page