पाककला स्पर्धेत प्रमिला शिरोडकर प्रथम

नांदोस येथे माता यशोदा परिवाराने केले होते आयोजन

ओरोस ता.०९-: मालवण तालुक्यातील नांदोस गावामध्ये माता यशोदा परिवाराच्या वतीने घेण्यात आलेल्या महिलांच्या पाककला स्पर्धेत प्रमिला शिरोडकर यांनी प्रथम क्रमांक मिळविला.


आरोग्य व स्वच्छतेचा प्रसार करणाऱ्या माता यशोदा परिवारातर्फे ग्रामीण भागातील महिलांना प्रोत्साहित करण्यासाठी श्रीकृष्ण हरचांदे यांच्या पुढाकाराने नांदोस येथे महिलांसाठी पाककला स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेत द्वितीय क्रमांक वैशाली मारगी, तृतीय क्रमांक हेमांगी काळसेकर यांनी मिळविला. तर उत्तेजनार्थ गौरी पार्टे, नमिता नांदोसकर, पूजा थवी, मीनल पार्टे, पूजा नलावडे यांनी मिळविला. अरुणा हरचांदे यांच्या उपस्थितीत डॉ ज्योती राजपुरकर यांच्याहस्ते विजेत्यांना रोख रक्कम, शाल, श्रीफळ व प्रमाणपत्र देवून गौरविण्यात आले. सुजाता पावसकर व प्रियांका भोगटे यांनी परीक्षण केले. महिलांना प्रोत्साहन देण्यासाठी माता यशोदा परिवारातर्फे घेण्यात आलेली पाककला स्पर्धा हा स्तुत्य उपक्रम असल्याचे यावेळी प्रियांका भोगटे यांनी सांगितले. यावेळी प्रिया कांबळी, भक्ती हरचांदे यांच्यासह महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

You cannot copy content of this page