बांदा केंद्र शाळेत वर्षभर नियमित उपस्थित राहिलेल्या विद्यार्थ्यांचा सन्मान

⚡बांदा ता.०७-: विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी विविध उपक्रमांचे आयोजन करून गुणवत्ता विकास घडवून आणणाऱ्या जिल्हा परिषद बांदा नं.१ केंद्रशाळेत वर्षभर नियमितपणे १००% उपस्थित राहिलेल्या विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला.

बांदा केंद्र शाळा ही जिल्ह्यातील सर्वात पटसंख्या असलेली शाळा असून या शाळेची पटसंख्या ही दिवसेंदिवस वाढत आहे .या शाळेत सातत्याने नवनवीन उपक्रम यशस्वीपणे राबविले जातात. सन २०२२-२३या शैक्षणिक वर्षात वर्षभर नियमित पणे उपस्थित राहिलेल्या विद्यार्थ्यांचा वार्षिक निकालाच्या वेळी गुलाबपुष्प देऊन सन्मान करण्यात आला.यावेळी उपशिक्षक जे.डी.पाटील यांनी सन २०२२-२३या शैक्षणिक वर्षातील शाळेने केलेल्या उल्लेखनीय कार्याचा आढावा सांगितला. मुख्याध्यापक श्रीकांत आजगावकर यांनी शाळेत विविध योजनांची माहिती दिली. यावेळी ज्येष्ठ शिक्षिका सरोज नाईक , पदवीधर शिक्षिका उर्मिला मोर्ये, उपशिक्षक रंगनाथ परब ,वंदना शितोळे याबरोबर शिक्षक व पालक उपस्थित होते.

You cannot copy content of this page