पालकमंत्री रवींद्र चव्हाण आणि माझ्यात वाद लावण्याचा तेलींचा प्रयत्न…

मंत्री दिपक केसरकर यांचा आरोप; तिसऱ्यांदा आमदारकीसाठी प्रयत्न मात्र हॅट्रिक नक्कीच करू

⚡सावंतवाडी ता.०७-: जिल्हा परिषद अध्यक्ष होऊनही स्वतःच्या जिल्हापरिषद मतदार एकदा आणि सावंतवाडी विधानसभा मतदार संघात दोनदा पराभूत झालेले राजन तेलींना पुन्हा येथे आमदारकी लढवायची आहे आणि त्यामुळेच याठिकाणी भाजपा शिवसेना युतीत वाद लावण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप शालेय शिक्षण मंत्री केसरकर यांनी आज येथे केला.तर पालकमंत्री रविद्र चव्हाण आणि माझे चांगले संबंध असतांना भाजपा जिल्हाध्यक्ष राजन तेली विकास कामांवरुन गैरसमज पसरून आमच्यात वाद लावण्याचा प्रयत्न करीत आहे मात्र हा प्रकार मी कदापी सहन करणार नाही याबाबत वरिष्ठ स्तरावर बोलावे लागेल असा इशाराही मंत्री केसरकर यांनी दिला.

मंत्री दीपक केसरकर यांनी आज आपल्या निवासस्थानी पत्रकार परिषद घेतली यावेळी ते बोलत होते. ते म्हणाले, सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात माझ्या शिफारशी शिवाय एकही काम मंजूर होऊ शकत नाही मात्र काहीजण मी एकही काम मंजूर केले नाही असे सांगून जनतेमध्ये गैरसमज पसरण्याचा प्रयत्न करत आहेत. मुळात मी मंजूर करुन आणलेल्या कामाचे भूमीपूजन राजन तेली करत आहेत. मी कधीच श्रेयवादासाठी काम करीत नाही. मात्र विकासकामांवर माझ्यात आणि पालकमंत्री रविद्र चव्हाण यांच्यात गैरसमज करुन खोटा प्रचार करत असल्यास तर ते मी सहन करणार नाही.
मंत्री केसरकर म्हणाले, स्वतःच्या घरात एकदा आणि माझ्या घरामध्ये दोनदा पराभूत झालेल्या राजन तेली यांना पुन्हा याठिकाणी आमदारकी लढवायचीच आहे त्यामुळेच ते येथे भाजपा आणि शिवसेना युतीत वाद निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र सावंतवाडी मतदार संघात नव्हे तर जिल्ह्यात युतीत कुठल्याही प्रकारे वाद होता कामा नये.मुळात वाद लावणारी लोक आयुष्यात काहीच करु शकत नाही केवळ बॅनरबाजी करु शकतात. त्यामुळे तेली यांना येथे निवडणूक लढवायची इच्छाच असेल तर त्यांची हॅट्ट्रीक करावीच लागेल.
ते म्हणाले, सावंतवाडी नगरपालिकेच्या पाळणेकोंड धरणावरील जपानी योजनेसाठी 56 कोटी रुपये शासनाच्या नगर विकास खात्याकडून मंजूर झाले आहेत. मी नाशिक वरून आवश्यक पत्र आणून दिल्याने हे पैसे मंजूर झाले आहेत. मुळात ही योजना पूर्णत्वास लावण्यासाठी तीन ते चार वर्षे उलटणार आहे मात्र तत्पूर्वी आपण दिलेल्या तीन कोटी रुपयांत शहरातील पाणी प्रश्नावर तोडगा काढला जाणार आहे. तीन कोटी मध्ये संपूर्ण पाईपलाईन बदलण्यात येणार आहे केवळ वन विभागाच्या परवानगीमुळे हे काम रखडले आहे आहे ते पुर्ण करुन शहरातील पाणी प्रश्न मिटवण्यात येणार आहे. 56 कोटीच्या योजनेच्या प्रस्तावामध्ये काही बदल करावे लागणार आहेत यामध्ये धरणाची उंची वाढवावी लागणार आहे. सावंतवाडी शहरातील वाढती लोकसंख्या लक्षात घेता माझगाव येथे प्रस्तावित धरणाचं काही पाणी शहरात आणावे लागणार आहेत यामध्ये गड भागातील पाण्याचा प्रश्न मिटणार आहे तसा आपला प्रयत्न आहे.

You cannot copy content of this page