नट वाचनालय उपाध्यक्ष सुभाष मोर्ये यांचे प्रतिपादन
बांदा/प्रतिनिधी
राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांना जनतेविषयी विशेष कळवळा होता. त्यांनी शेतकऱ्यांसाठी व शैक्षणिक विकासासाठी विविध योजना अमलात आणल्या. म्हणूनच त्यांना लोकराजा म्हणून मान्यता होती. त्यांच्या विचारांना आचरणात आणणे हीच त्यांना खरी आदरांजली ठरेलं असे प्रतिपादन नट वाचनालयचे उपाध्यक्ष सुभाष मोर्ये यांनी येथे केले.
येथील नट वाचनालयात छत्रपती शाहू महाराज यांची पुण्यतिथी साजरी करण्यात आली. वाचनालायचे अध्यक्ष एस. आर सावंत यांच्या हस्ते त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी संचालक जगन्नाथ सातोसकर, निलेश मोरजकर, संचालिका स्वप्नीता सावंत, ग्रंथपाल प्रमिला नाईक-मोरजकर, सुनील नातू, अमिता परब आदीसह वाचक उपस्थित होते.
