बांदा/प्रतिनिधी
येथील जि. प. पूर्ण प्राथमिक शाळा बांदा निमजगा शाळेस उद्योजक समीर शंकर शेटकर यांनी आपले वडील (कै.) शंकर कृष्णाजी शेटकर यांच्या स्मरणार्थ संगणक भेट दिला.
श्री शेटकर याचे बांदा शहरात शेटकरवाडी याठिकाणी मूळ घर असून सध्या ते बदलापूर येथे व्यवसायाच्या निमित्ताने राहतात. बांदा येथील त्यांचे बंधू शैलेश शेटकर यांनी यासाठी विशेष प्रयत्न केले.
यावेळी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष संदीप बांदेकर, सदस्य शैलेश शेटकर, वासुदेव तांडेल, शिवराम बहिरे, दिपक नाईक, बाळकृष्ण सावंत, संजू सामंत, मयूर लांगे, भावेश शेटकर उत्कर्ष शेटकर आदी उपस्थित होते. भविष्यात देखील शाळेच्या शैक्षणिक व भौतिक गरजासाठी मदत करण्याचे आश्वासन श्री शेटकर यांनी यावेळी दिले.
