प्रत्येक गावात अधिकारी निर्माण झाला पाहिजे-:मा.सत्यवान रेडकर….

*💫दोडामार्ग दि.२२ सुमित दळवी-:* गावा गावातुन शासकीय कर्मचारी आणि अधिकारी निर्माण झाले पाहिजेत म्हणून तिमिरातून तेजाकडे उपक्रमांतर्गत आज सरस्वती विद्या मंदिर कुडासे मध्ये भारत सरकार (मुंबई)मध्ये अधिकारी म्हणून कार्यरत असलेले मा.सत्यवान रेडकर मुळगाव -सावंतवाडी यांनी कुडासे गावातील मुलांना भविष्यातील यशस्वी वाटचाल बाबत सखोल मार्गदर्शन केले. रेडकर सरांनी आपला प्रेरणादायीजीवनपट उलगडून सांगताना शासकीय अधिकारी का झालं पाहिजे त्यासाठी आत्ता पासून कशी तयारी केली पाहिजे याबाबत सखोल मार्गदर्शन केले.सामान्यज्ञान ,भौगोलिक, ऐतिहासिक आणि वैज्ञानिक ज्ञान कसे महत्वाचे आहे यावर प्रकाशझोत टाकत ज्ञानाची चाचपणी केली.भविष्यात स्पर्धा परीक्षाना सामोरे जाताना लागणाऱ्या मार्गदर्शनाची हमी देत तंत्रज्ञानाचा उपयोग ज्ञानवृद्धी साठी कसा केला पाहिजे हे स्पष्ट केले. यावेळी उपस्थित कुडासे सरपंच सौ पूजा देसाई,तिमिरातून तेजाकडे संस्था प्रमुख श्री सचिन रेडकर मुख्याध्यापक श्रीपाटील सर ग्रामपंचायत सदस्य श्री राजाराम देसाई ,श्री प्रसाद कुडास्कर आणि सामाजिक कार्यकर्ते श्री रामदास मेस्त्री उपस्थित होते .कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जनार्दन पाटील यांनी केले.

You cannot copy content of this page