Headlines

आरोंदा येथे ४३० मिलीग्रॅम गांजा जप्त…

सावंतवाडी पोलिसांची कारवाई : कोल्हापुरच्या दोघांना ताब्यात_*

*💫सावंतवाडी दि.२२-:* आरोंदा येथे सावंतवाडी पोलिसांनी केलेल्या कारवाईत गांजा जप्त केला. या प्रकरणी कोल्हापुरच्या दोघांना ताब्यात घेतले. गोव्याहून रेनाॅल्ड डस्टर कारमधून गांजा घेऊन आरोंदामार्गे कोल्हापूरला रात्री बारा वाजता जात होते. पोलिसांनी आरोंदा दुरक्षेत्र येथे कारची तपासणी केली असता त्यात ४३० मिलीग्रॅम गांजा आढळला. ताब्यात घेण्यात आलेल्यांची मुबारक, सलीम अशी नावे आहेत. हवालदार विजय केरकर, माडखोलकर यांनी ही कारवाई केली.

You cannot copy content of this page