गावमर्यादित मानकरी व ब्राम्हणांच्या उपस्थितीत कोरोनाच्या नियमांचे पालन करुन होणार साजरा
*💫सावंतवाडी दि.२२सहदेव राऊळ-:* सावंतवाडी तालुक्यातील नेमळे येथील जागृत श्री देव कलेश्वर-मलेश्वर पंचायतनाचा वर्धापनदिन सोहळा मंगळवार २३ फेब्रुवारी ते गुरुवार २५ फेब्रुवारी या कालावधीत गावमर्यादित मानकरी व ब्राम्हण यांच्या उपस्थितीत कोविड-१ ९ नियमांचे पालन करुन साजरा होणार आहे. या निमित्ताने श्री देव मलेश्वर मंदिरामध्ये शिवमहिम्ना स्वाहाकार संपन्न होणार आहे. यानिमित्त मंगळवार २२ फेब्रुवारी (माघ शुध्द एकादशी) रोजी सकाळी ७.०० ते ९ .०० वाजता शांतीपाठ, देवतांची प्रार्थना, पुण्याहवाचन, संभारदान, सकाळी ९.०० ते दुपारी १.०० या वेळेत सिध्दीविनायक महागणपती पूजन, प्राकारशुध्दी, दवता स्थापना, शिवमहिम्ना स्वाहाकार आदी कार्यक्रम होणार आहेत. बुधवार २४ फेब्रुवारी (माघ शुध्द व्दादशी) रोजी सकाळी ७.०० वाजल्यापासून अग्निस्थापन, होमहवन, सकाळी ११.०० वाजता पूर्णाहुती, दुपारी १२.३० वाजता महानैवेद्य, आरती, तीर्थप्रसाद, महाप्रसाद, गुरुवार २५ फेब्रुवारी (माघ शुध्द त्रयोदशी) रोजी सकाळी ७.०० वाजता श्री देवी सातेरी मंदिरात लघुरुद्र अभिषेक, दुपारी १२.०० वाजता आरती, तीर्थप्रसाद, महाप्रसाद आदी कार्यक्रम होणार आहेत. भाविकांनी या सोहळयास मास्क व सॅनिटायझरचा वापर करुन उपस्थित राहून कार्यक्रमाचा व महाप्रसादाचा लाभ घ्यावा, असे आवाहन श्री देव मलेश्वर देवस्थान स्थानिक सल्लागार उपसमिती नेमळे अध्यक्ष, नेमळे ग्रामविकास मंडळ मुंबई अध्यक्ष व मलेश्वर सातेरी देवस्थान,नेमळे गावकर मंडळींनी केले आहे.
