तिन्ही नौका मालकांना प्रत्येकी एक लाखाचा दंड

पर्ससीन जाळ्याने मासेमारी केल्याने झाली कारवाई

मालवण दि प्रतिनिधी

ट्रॉलिंगचा परवाना असताना पर्ससीन जाळ्याने मासेमारी करणाऱ्या रत्नागिरी जिल्ह्यातील ‘त्या’ तीन नौकांच्या मालकांना प्रत्येकी एक लाख रुपयांचा दंड तत्कालीन सहाय्यक आयुक्त मत्स्य व्यवसाय तथा अभिनिर्णय अधिकारी रत्नाकर राजम यांनी ठोठावला आहे.

मालवण बंदरासमोर २९ नोव्हेंबर रोजी सायंकाळी मत्स्य विभागाची ‘शीतल’ गस्ती नौका गस्तीसाठी गेली असता, मत्स्य विभागाच्या पथकाला गोव्यातील एक, तर रत्नागिरीतील सहा असे एकूण सात नियमबाह्य पर्ससीन मासेमारी करताना आढळून आले होते. या सातही नौकांविरोधात बेकायेदशीर पर्ससीन मासेमारीप्रकरणी सहाय्यक आयुक्तांकडे सहाय्यक मत्स्यविकास अधिकारी तेजस्विता करंगुटकर आणि परवाना अधिकारी मुरारी भालेकर यांनी प्रतिवेदन दाखल केले होते. यापैकी रत्नागिरीतील तीन प्रतिवेदनांवर याअगोदर सहाय्यक मत्स्य आयुक्त कार्यालयात सुनावणी घेण्यात आली होती. त्या तिन्ही नौकांना प्रत्येकी एक लाख रुपयांचा दंड ठोठावत त्यांचा परवाना तीन महिन्यांसाठी निलंबित करण्यात आला होता.

उर्वरित वायएम अरहान (आयएनडी – एमएच-०४- एमएम-४५४३), जुनैद सलमान २ (आयएनडीएमएच ०४- एमएम-४६४२) आणि मुहमंद झेन अर्श (आयएनडी – एमएच-०४- एमएम-४४४८) या तीन नौकांकडे टॉलिंगचा परवाना असताना बेकायदेशीररित्या पर्ससीन मासेमारी केल्याप्रकरणी लाखाचा दंड ठोठावण्यात आला आहे.

यापैकी मुहमंद झेन अर्शचा परवाना रद्द करण्यात आला. अन्य दोन नौकांचा ट्रॉलिंग परवाना तीन महिन्यांसाठी निलंबित करण्यात आला आहे.

You cannot copy content of this page