तिसरा स्मृतीलीला पुरस्कार वितरण १७ रोजी

मालवण असोसिएशन आणि सकल भंडारी हितवर्धक संस्थेचे आयोजन

मालवण दि प्रतिनिधी

मालवण असोसिएशन व सकल भंडारी हितवर्धक संस्था, मालवण स्पोर्टस् आयोजित लिलाधर गणेश हडकर यांच्या तृतीय स्मृतिप्रित्यर्थ हडकर कुटुंबियांतर्फे सौ. नंदिता राजेश पाटील पुरस्कृत सर्वोत्कृष्ट गुणवंत अष्टपैलू व्यक्तिमत्वांसाठी तिसरा स्मृतिलिला पुरस्कार वितरण सोहळा १७ मार्च रोजी सायंकाळी ४ वाजता येथील लिलांजली हॉल, भरड येथे होणार आहे. मालवण स्पोर्ट्स असोसिएशनचे अध्यक्ष रामा शेटये, भाई गोवेकर व प्रथम स्मृतिलिला पुरस्काराचे मानकरी. भाई खराडे यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे. उत्कृष्ट क्रिकेटपटू नरहरी चिंदरकर, बॅडमिंटनपटू महेश परब, व्हॉलीबॉलपटू विलास हरमलकर, उदयोन्मुख टेबल टेनिसपटू आर्या दिघे, उदयोन्मुख किक्रेटपटू मंदार माडये यांचा सन्मान होणार आहे. उपस्थिते: राहण्याचे आवाहन सकल भंडारी हितवर्धक संस्था, मालवणचे अध्यक्ष रवींद्र तळाशीलकर यांनी केले आहे.

You cannot copy content of this page