उद्योजक नंदकुमार घाटे, माजी आमदार अजित गोगटे यांच्यासह उमेदवारांची उपस्थिती
देवगड
देवगड तालुका अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक पंचवार्षिक निवडणूक २०२३ च्या निवडणुकीतील शिवम पॅनेलच्या प्रचाराचा शुभारंभ उद्योगपती नंदकुमार घाटे,माजी आमदार अजित गोगटे ,विद्यमान संचालक चेअरमन दिलीप तथा भाई आचरेकर,जिल्हा बँक संचालक ऍड प्रकाश बोडस ,भाजप जिल्हा उपाध्यक्ष बाळ खडपे,प्रकाश राणे तालुका अध्यक्ष संतोष किंजवडेकर,डॉ अमोल तेली सर्व उमेदवार यांच्या प्रमुख उपस्थितीत ग्रामदेवता श्री दिर्बादेवी,रामेश्वर,तसेच श्री देव ब्राम्हणदेव यांचे दर्शन घेऊन मान्यवरांच्या हस्ते श्रीफळ फोडून करण्यात आला.
फोटो-१)देवगड अर्बन बँक शिवम पॅनल शुभारंभ प्रसंगी विजयी खूण दाखविताना नंदकुमार घाटे,अजित गोगटे,व शिवम पॅनल उमेदवार व अन्य
२)देवगड अर्बन बँक प्रचाराचा श्रीफळ फोडून शुभारंभ करताना ऍड अजित गोगटे ,नंदकुमार घाटे व अन्य
