अजिंक्य ग्रामीण पतसंस्थेचे स्वमालकीच्या जागेत स्थलांतर

अध्यक्ष घाटे, उपाध्यक्ष मांजरेकर यांच्याहस्ते झाला शुभारंभ

देवगड
तालुक्यातील सहकार क्षेत्रात अग्रभागी असलेल्या अजिंक्य ग्रामीण बिगर शेती सहकारी मर्यादित पतसंस्था देवगड या पतसंस्थेच्या स्वमालकीच्या नूतन इमारत स्थलांतर सोहळा संस्थेचे अध्यक्ष नंदकुमारशेठ घाटे यांच्या हस्ते फीत कापून, उपाध्यक्ष प्रदीप मांजरेकर यांच्या हस्ते श्रीफळ फोडून सोमवारी सकाळी पार पडला.

या निमित्ताने ज्येष्ठ संस्थापक अध्यक्ष नंदकुमार घाटे यांच्या हस्ते गणेश पूजन करण्यात आले. या सोहळ्याला सदस्य, चंद्रकांत पाळेकर रामदास अनभवणे, सुधीर देवगडकर दिलीप रुमडे, दिनेश घाटे अभय बापट, सौ पूनम कुबल,ललिता शेडगे नाना मुणगेकर देवगड अर्बन बँकेचे संचालक चेअरमन दिलीप आचरेकर, सुरेश सोनटक्के देवदुर्ग संस्थेचे सचिव कृष्णा परब, ज्येष्ठ संचालक बाबा बेळणेकर, ज्ञानेश्वर खवळे भाऊ कदम, शरद शिंदे, मनोज सहस्त्रबुद्धे सूर्यकांत पाळेकर, शिवप्रसाद पेडणेकर जितेंद्र पिसे डॉ. रघुनाथ पोकळे, व्यवस्थापक प्रमोद कोयंडे सर्व कर्मचारी उपस्थित होते. या निमित्ताने संस्थेच्या वाटचाली त महत्त्वपूर्ण भूमिका बजावणारे माजी संचालक, विद्यमान संचालक प्रतिष्ठित नागरिक, पत्रकार या सर्वांचा शाल श्रीफळ देऊन अध्यक्ष नंदकुमार घाटे यांच्या हस्ते यथोचित सन्मान करण्यात आला. संस्थेच्या गेल्या २९वर्षाच्या वाटचालीत संस्थापक अध्यक्ष नंदकुमार घाटे यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली त्याबद्दल त्यांचा विशेष सन्मान मान्यवरांचे उपस्थितीत करण्यात आला.

You cannot copy content of this page