जिल्हाध्यक्ष इर्शाद शेख यांनी केला सत्कार
मालवण, दि प्रतिनिधी
मालवण तालुका राष्ट्रीय काँग्रेस अल्पसंख्याक विभाग अध्यक्षपदी सरदार ताजर यांची सर्वानुमते निवड करण्यात आली आहे. जिल्हाध्यक्ष इर्शाद शेख यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला.
मालवण तालुक्यातील राष्ट्रीय काँग्रेस पदाधिकारी कार्यकर्त्यांची जिल्हा सरचिटणीस अरविंद मोंडकर यांच्या कार्यालयात संघटना वाढीबाबत जिल्हाध्यक्ष इर्शाद शेख यांच्या उपस्थितीत बैठक घेण्यात आली. या बैठकीत तालुका अल्पसंख्याक विभाग अध्यक्षपदी सरदार ताजर यांची निवड करण्यात आली. तालुक्यातील सर्वच अल्पसंख्याक बांधवांना एकत्रित करुन लवकरच कार्यकारिणी बनवणार असल्याचे श्री. ताजर यांनी यावेळी स्पष्ट केले.
यावेळी जिल्हाध्यक्ष इर्शाद शेख, प्रांतिक सदस्य साईनाथ चव्हाण जिल्हा सरचिटणीस अरविंद मोंडकर, संदेश कोयंडे, ओबीसी जिल्हाध्यक्ष बाळु अंधारी, सेवादल जिल्हाध्यक्ष श्रीकृष्ण तळवडेकर, आनंद परुळेकर, पल्लवी तारी- खानोलकर, मेघश्याम लुडबे, महेंद्र मांजरेकर, देवानंद लुडबे, जेम्स फर्नाडिस, लक्ष्मीकांत परुळेकर, पराग माणगावकर, योगेश्वर कुर्ले, महिला तालुकाध्यक्षा ममता तळगावकर, वायरी उपसरपंच प्राची माणगावकर, शोभना चिंदरकर व इतर पदाधिकारी उपस्थित होते.
