बांद्यात स्मशानभूमीची श्रमदानाने साफसफाई

सामाजिक कार्यकर्ते अर्णव स्वार व साईप्रसाद काणेकर मित्रमंडळाचा पुढाकार

बांदा/प्रतिनिधी
सामाजिक कार्यकर्ते अर्णव स्वार व साईप्रसाद काणेकर मित्रमंडळाच्या वतीने आज येथील स्मशानभूमी व परिसराची श्रमदानाने साफसफाई करण्यात आली. सामाजिक कार्याचे कौतुक होत आहे.
यावेळी अर्णव स्वार, ग्रामपंचायत सदस्य साईप्रसाद काणेकर, ओंकार नाडकर्णी, निखिल मयेकर, प्रथमेश गोवेकर, समीर सातार्डेकर, दीनानाथ देसाई, भाऊ वाळके, नागेश बांदेकर, बिपीन येडवे, अजिंक्य पावसकर, ज्योतीनंद कुंभार, रितेश नाटेकर, मयुरेश महाजन, गोटू गोवेकर, शुभम पांगम, ओंकार नाटेकर, शांताराम राऊत आदी उपस्थित होते.
मित्रमंडळाच्या या सामाजिक उपक्रमाबद्दल समाजातून कौतुक होत आहे. स्मशानभूमीच्या मुख्य इमारतीची तसेच परिसराची साफसफाई करण्यात आली. इमारतीची रंगरंगोटी देखील मित्रमंडळाच्या कार्यकर्त्यांनी केली.

You cannot copy content of this page