मालवण पोलीस ठाणे वतीने रस्ता सुरक्षा अभियान अंतर्गत रिक्षा रॅली द्वारे मालवण शहरात जनजागृती

⚡मालवण ता.१७-: मालवण पोलीस ठाणे अंतर्गत रस्ता सुरक्षा अभियान २०२३ अंतर्गत जनजागृती व मार्गदर्शन वाहतूक पोलीस गुरुप्रसाद परब यांच्या वतीने मालवण शहर परिसरात विविध ठिकाणी करण्यात आले.

मंगळवारी मालवण भरड बसस्थानक मार्गावर रिक्षा रॅली काढण्यात आली. भरड नाका येथील रिक्षा व्यावसायिक यात सहभागी झाले. यासह वाहन चालक वाहतूक नियम, वाहन चालवताना घ्यावयाची दक्षता, सुरक्षा, याबत वाहन चालक यांना मार्गदर्शन करण्यात आले. पोलीस निरीक्षक विजय यादव व वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली रस्ता सुरक्षा अभियान राबवण्यात येत असून त्या अंतर्गत मालवण शहरात विविध ठिकाणी रिक्षा स्टॅण्ड तसेच बसस्थानक, कुंभारमाठ, पॉलिटेक्निक, आयटीआय या ठिकाणीही मार्गदर्शन करण्यात आल्याचे वाहतूक पोलीस गुरुप्रसाद परब यांनी माहिती देताना सांगितले.

You cannot copy content of this page